अनेक वाचकांच्या आग्रहाखातर हा परंपरागत विनोदी कथा/चुटकुले अर्थात विनोदी लेखनाचा धागा सुरु करण्यात आला आहे. इथे विनोदी रचनांचे संकलन होणार असल्याने रचना/विनोद/चुटकुले स्वरचित असणे अनिवार्य नाही. रचना स्वतःची असल्यास रचनेखाली नाव लिहावे. संकलित असल्यास कंसामध्ये संकलित असे लिहावे. रचना निर्मात्याचे नाव माहित असल्यास रचनाकार/लेखक/कवी म्हणून नाव लिहावे.
खालील प्रतिसादामध्ये आपल्या रचना सादर कराव्यात.
******
प्रताधिकारासंबंधी : विनोदाचा निर्भेळ आनंद घेण्याच्या स्वच्छ उद्देशाने हा धागा असून संबंधित रचनाकाराचे नाव माहित झाल्यास रचनेखाली नाव लिहिण्यात येईल किंवा संबंधितांच्या इच्छेनुसार रचना काढून टाकली जाऊ शकेल.
प्रतिक्रिया
Andi2702
लय दिवसान
लय नवसान
लागलय आभाळ गाया
धरणी आईची माया
जाते काय सोयाबीन वाया
(संकलित)
Andi2702
एका मालवणी माणसाक
गणपती प्रसन्न झालो,
गणपतीन त्येका इचारल्यान...
" काय व्हया तुका ता माग..?"
तो मालवणी म्हणालो की "देवा महाराजा माका Nano
व्हयी...."
गणपती म्हणालो " आवशिक खाव्
व्हरान, nano व्हयी तुका..
मीया उंदरा वरुन फिरतय,
माझो बापूस नंदि वरुन फिरता,
माझी आव्स वाघा वरुन फिरता,
माझो भावस मोरा वरुन फिरता..
आणि तुका वाटता काय मीया तुका nano
देयन..?.."
जोक हयच संपना नाय...
त्यावर ह्यो मालवणी देवाक लय
भारी उत्तर दिता.. तो म्हणता..
देवा महाराजा "मग मी विंचू वर
बसान फिराक तयार आसय..
माका एक scorpio दी रे महाराजा......
(संकलित)
A.B.Patil
पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
.
.
....
.
.
.
.
.
"एक गाणं म्हणू का?"!!!!!!!
(संकलित)
A.B.Patil
एक मुंबईकर, पुण्यातील सदाशिव पेठेतील माणसाला विहीर विकतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईकर, त्या पुणेकराला भेटतो व सांगतो की मी माझी फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, तुला पाणी हवे असल्यास पाण्याची किंमत मोजावी लागेल. यावर पुणेकर म्हणतो की अहो मीच तुम्हाला भेटणार होतो माझ्या विहिरीत जे तुमचे पाणी आहे ते दोन दिवसात काढून घ्या नाहीतर तुम्हाला पाणी ठेवण्याचे भाडे द्यावे लागेल.
(संकलित)
A.B.Patil
एका पेट्रोल पंप मध्ये काम करणाऱ्या मुलाची भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. पहिल्या सामन्यात अॉस्ट्रेलिया विरुद्ध त्याला ओपनिंग बॉलिंग देण्यात आली. बॉलिंग टाकण्याआधी स्कोरबोर्ड कडे बोट दाखवत तो डेविड वार्नर ला म्हणाला
.
.
.
झिरो बघा
(संकलित)
A.B.Patil
मेंदू हा २४ तास काम करत आसतो.
तो फक्त दोनदाच बंद पडतो.
१:-परीक्षेच्यावेळी...
.
.
आणि
.
.
२:- बायको पसंद करताना
(संकलित)
Andi2702
8 वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो....
पप्पा, साडू-साडू म्हणजे काय....?
.
.
वडील: एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक....!
********
आई, जावा जावा म्हणजे काय ग?
"मालकी हक्क दिला जाईल" ह्या आश्वासनावर एकाच कंपनीत वेठबिगार ठेवलेल्या दोन मजूर बायका
(संकलित)
A.B.Patil
बायकोलॉजी.
एक सोपी उपाय
बायकोची कटकट सुरु झाली की एक काम करायचं...
बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक missed call ठोकायचा..
एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...
" नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते...
तास दीड तास चिंता नसते आपल्याला !
कटकट थांबलेली असते ...
आणि आपण निर्धास्त होतो.
(संकलित)
A.B.Patil
परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात...........
बाकी नवरा बायको वगेरे सर्व अंधश्रद्धा आहेत.
(संकलित)
विनिता
भारीच सर्व विनोद
गंगाधर मुटे
तुम्ही पण विनोद टाकत चला, स्वागत आहे.
A.B.Patil
IN A BANK
CUSTOMER: मॅडम,
मला चेक डिपॉझिट करायचा
आहे कधीपर्यंत क्लिअर होईल?
BANK कर्मचारी : सर 2 ते 3 दिवस लागतील .
CUSTOMER: दोन्ही बँक समोरासमोरच आहेत ना ?
मग एवढा उशीर का ??
Bank कर्मचारी : सर procedure follow
कराव्या लागतात ....
For example .....
जर समजा तुमचा ऍक्सिडेंट स्मशानभूमी समोर झाला आणि तुम्ही मेला तर ..तुम्हाला घरी नेऊन ,पाहुणे रावळे बोलावून,अंत्यसंस्कार ची विधी करून ,अंघोळ घालून आणतील का लगेच स्मशानभूमीत नेतील जाळायला ?
CUSTOMER : असलं खतरनाक उदाहरण देऊ नका.
,जेव्हा क्लिअर व्हायचंय,
तेव्हा होऊ द्या मी समजलो.
(संकलित)