माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
देशभक्तीगीत
गगनावरी तिरंगा ....!!
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
वाचकांच्या भेटी