माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
शेतकरी गीत
डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती? आलं वरिस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती? आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती? घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती? तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमिन नांगरुन उभं पीक नाचे सोन्यानं फुलून पर एक मेला सावकार ठोला हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा असं उपाशी राहून आम्ही मरावं किती?
या संसारा बाई सांजी येईना रक्त गाळून अंगा धडूत मिळंना कष्टाचं फळ बाई पदरात पडंना टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?
अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा संसार वेलीच्या फुलवाया फुला रुप नवं आणू माय धरतीला
वाचकांच्या भेटी