भाषेच्या गमती-जमती : भाग-१

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture

भाषेच्या गमती-जमती : भाग-१

        मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ आहे, हे तुम्ही जाणताच. काही वर्षापूर्वी माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून "त्यांनी" मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जिते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे "हा विषय रटाळ" आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चीड हे एक प्रमुख कारण आहे.

त्याचं काय झालं...

        पाचव्या-सहाव्या इयत्तेत असतानाची गोष्ट. प्रशांतने इंग्रजीच्या मास्तरांना एक शंका विचारली. की Cut चा उच्चार कट असा  तर Put चा उच्चार पट असा का करत नाही किंवा Put म्हणजे पूट होत असेल तर Cut कूट का होत नाही? 

     यावर मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच.
एवढा हादरला की त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले.
त्याच्या हृदयाचे एवढे पाणी झाले की ते त्याच्या पायजम्याखालून ओघळत ओघळत डाव्या पायाच्या आधाराने चक्क जमिनीवर उतरले.

व्याकरण एवढे जहाल, क्रूर आणि निर्दयी असते असे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आणि "ह्रुदयाचे पाणी होणे" याचा अर्थही समजला.

त्यामुळे व्याकरणविषयक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी कधीच कुणाला विचारले नाही आणि म्हणून माझे व्याकरण कच्चे राहिले.

खालील शब्दांचा मला अजूनही नीटसा उलगडा झालेला नाही.

१) पायात चप्पल घालायची की चपलेत पाय घालायचे?
२) अंगात सदरा घालायचा की सदर्‍यात अंग घालायचे?
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?
४) हातात बांगड्या भरायच्या म्हणजे पोत्यात धान्य भरतो तशा भरायच्या?

असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
जाणकारांनी उत्तरे द्यावीत आणि माझ्या व्याकरण ज्ञानात भर घालावी.

- गंगाधर मुटे
......................................................................