दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे
या शहाण्यांच्या सद्बुद्धीवर, अवदसा कुठूनी आली?
मुळी कशाची लाज न उरली; की बुद्धी भ्रमिष्ट झाली?
पगार-वेतन विनाश्रमाचे यांना करतसे नादान है? ॥

या देशाच्या पुढारकांचा दिमाग सटकला आहे!
दीडदमडीच्या सुधारकांचा विवेक भटकला आहे!!
एकच प्रश्न अंतिम आता, पुसून घेऊ पुन्हा
विद्वानांनो, सुशिक्षितांनो, अरे! काय बिमारी तुम्हा?
काय नेमका इलाज तुम्हावर? आयुर्वेद की अ‍ॅलो?
धागे-दोरे की मांत्रिक-बाबा? बस एकबार तो बोलो!
जेणेकरूनी विवेक तुमचा येईल ताळ्यावरती
'अभय'तेने जगेल जनता त्यांच्या शेतावरती
आम्हालाबी जगू द्या आता! हम भी तो इन्सान है!!

                                          - गंगाधर मुटे 'अभय’
---------------------------------------------------

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    December 20, 2013 01:55 PM

    एकाचवेळी एकापेक्षा जास्त एकसमान घटना घडत असतील तर मग प्राधान्यक्रम ठरवणे महत्वाचे ठरते.

    हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. त्या तुलनेने नरबळीमुळे मरणारांची संख्या अगदीच नगण्य किंवा कोणत्याच खिसगणतीत नाही. अशा परिस्थितीत कोणी हजारो शेतकर्‍यांच्या मरणाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसतील मात्र नरबळी मुळे राष्ट्रीय आपत्ती कोसळली आहे, असा आभास निर्माण करत असतील तर अशा दिडशहाण्यांच्या सदसदविवेकबुद्धीबद्दल संशय घ्यायला नक्कीच वाव तयार होतो.

    मरण हे मरण असते, ते कुणाचे का असेना, ते थांबायलाच हवे. अशी धारणा केवळ सर्वसाधारण माणसांची असते.
    "थोर, श्रेष्ट, समाजसुधारक, विद्वान" अशी बिरुदावली मिरवणार्‍यांची अशीच सोज्वळ धारणा/भावना असतेच असे नाही.

    सगळा समाज आनंदाने नांदावा, यासाठी केवळ सर्वसाधारण मनुष्य प्रयत्न करत असतो. पण;

    स्वतःला अतिविद्वान घोषीत करून समाज सुधारायला निघालेले बेगडी समाजसुधारक मात्र "केवळ त्यांची स्वतःची महती ज्यामुळे वाढते" केवळ तोच अजेंडा रेटत असतात.

    दुर्दैव आपले आणि आपल्या भारताचे, दुसरे काय?