मी मराठी - स्पर्धा विजेती गझल

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!

                                                                               गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
कविता/गझल                                                    वृत्त - सुमंदारमाला
लगावली - लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
----------------------------------------------------------------------------

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.
                  या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच
            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. Smile
                                                                                                                         - गंगाधर मुटे

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

 • विश्वजीत गुडधे's picture
  विश्वजीत गुडधे
  September 11, 2011 10:59 AM

  अतिशय उत्तम कविता आहे.

 • Andi2702's picture
  Andi2702
  September 11, 2011 05:58 PM

  मनःपूर्वक अभिनंदन. कविता आहेच अप्रतिम.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  September 11, 2011 06:00 PM

  विश्वजितजी, बिरबलजी

  धन्यवाद.

 • Malubai's picture
  Malubai
  September 11, 2011 07:47 PM

  नमस्ते सर,
  कविता खुप छान आहे.

  कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
  परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!

  ह्या ओळि खुप आवड्ल्या.

 • सागर's picture
  सागर
  September 12, 2011 11:36 AM

  मुटेसाहेब,
  पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  सुंदरच लिहिता तुम्ही , पण कवितेत गावाला एवढ्या प्रभावीपणे प्रकट केल्याबद्दलही आपले मनापासून अभिनंदन

 • Suresh Shirodkar's picture
  Suresh Shirodkar
  September 12, 2011 03:16 PM

  मुटेसाहेब,
  पहिल्या क्रमांकाचे विजेते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

  फारच सुंदर गझल लिहिलि तुम्ही.

  कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
  परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!

  ह्या ओळि खुप आवड्ल्या.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  September 12, 2011 03:23 PM

  मालुताई, सागरजी, सुरेशजी

  मनःपूर्वक धन्यवाद.

 • मुक्तविहारी's picture
  मुक्तविहारी
  September 29, 2016 12:20 AM

  खूपच छान गझल आहे सर !

  मनापासून अभिनंदन करतो.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  September 29, 2016 09:33 AM

  मनपूर्वक आभारी आहे.