माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
स्वप्नरंजन फार झाले सौख्यही बेजार झाले
झोपलेले ते निखारे जाग येता गार झाले
झुंजण्याची वेळ येता शौर्य-धैर्य बिमार झाले
झुंजणारे वीर खंदे आरशांचे हार झाले
खेळ येथे माकडांचे या भुईला भार झाले
पान कोरे अक्षरांना सांगते आचार झाले
बांधलेली भोवताली भिंत होती दार झाले
उत्तरांना पेलताना प्रश्नकोडे ठार झाले
“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे बंद सारे बार झाले
गंगाधर मुटे ……………………………….… वृत्त : मनोरमा लगावली : गालगागा गालगागा …………………………………
छोट्या बहरमधली ही गझल..मस्त झालेय.
धन्यवाद देव साहेब.
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
प्रमोद देव
छोट्या बहरमधली ही गझल..मस्त झालेय.
गंगाधर मुटे
धन्यवाद देव साहेब.