संपादकीय : अंगारमळा : आपण साक्षर की निरक्षर?

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक १ : डिसेंबर २०१६

आपण साक्षर की निरक्षर?

      हा प्रश्न ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्या सर्वांना मी विचारत आहे. मोबाईल, संगणकीय आणि संस्थळीय तंत्रज्ञान ज्या प्रचंड द्रुतगतीने झेप घेत आहे ते लक्षात घेतले तर अगदी येत्या दोनचार वर्षातच ४० वयोगटापुढील पिढी सपशेल अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       नोटाबंदीचा वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेवता येईल कारण या मुद्यावर मतेमतांतरे व्यक्त केली जात आहे आणि दोन्ही बाजूत बर्‍यापैकी तथ्यही आहे; पण त्याला जोडून "कॅशलेस/लेसकॅश आर्थिक व्यवहाराचा" मुद्दा जबळाईने रेटला जात आहे तो अशिक्षित व अर्धशिक्षित जनतेचा बहुसंख्य भरणा असलेल्या भारतासारख्या देशात चुकीचा आणि आर्थिक अराजकतेला आमंत्रण देणारा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही अत्यंत सावकाशपणे आणि पुरेशा कालबद्धतेने आखणी करून लेसकॅश आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देत टप्प्याटप्प्याने पुढे न्यायची प्रक्रिया आहे. एका रात्रीत घिसाडघाईने जनतेवर बळजबरीने लादण्यासारखा आणि जनतेनेही सुलभतेने आत्मसात करण्याइतका हा सोपा विषय नक्कीच नाही याचे भान राज्यकर्त्यांना असायलाच हवे होते.
       मात्र ज्या तर्‍हेने तंत्रज्ञान पुढे जात आहे ते बघता येणारा काळ हा पूर्णत: संगणकीय प्रणालीवर आधारलेलाच असेल; जिथे कागद, पेन आणि वही हद्दपार झालेली असेल. त्यांची जागा संगणकाच्या किंवा मोबाईलच्या कळफ़लकाने घेतलेली असेल. हा व्यवस्था बदल अटळ आहे कारण कमीखर्चिक, वेळ वाचवणारा, सुरक्षित आणि सोईचा आहे. येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा बदल थांबवणे किंवा अडवून धरणे कुणाच्याच आवाक्यात नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे, एवढाच एक पर्याय उपलब्ध आहे. 
आज जे चाळीशीच्या आत आहेत ते सहजगत्या अगदी आपोआप हा बदल आत्मसात करुन घेतील पण जे चाळीशीच्या वर आहेत त्यांचीच खरी गोची होणार आहे. एकतर ही पिढी या तंत्रज्ञानाबाबत उदासिन, अनभिज्ञ असल्याने त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याची जाणीव झालेली नाही शिवाय येऊ घातलेला काळ सर्व सद्यव्यवस्थेची उलथापालथ करणारा असणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यांच्या ध्यानीमनी नाही. या पिढीने वेळीच सावध होऊन अभ्यासाने, महतप्रयासाने नव तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. काळाची पावले ओळखता आली नाही आणि तदनुरुप स्वत:त बदल करुन घेता आले नाही तर सर्वसामान्य व्यक्तींची बात सोडा; अगदी स्वत:च्या नावासमोर अ‍ॅड, बॅ, डॉ, प्रा अशी बिरुदे लावणारी मंडळी सुद्धा अगदी अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानीपणाच्या पातळीवर घसरलेले असतील आणि त्यांच्या पेक्षा त्यांचा चवथीत शिकणारा दहा वर्षाचा नातू कैकपटीने सुशिक्षित, व्यवहार चतूर आणि सर्वज्ञानी असलेला बघायला मिळणार आहे.

एवढा काळबदल होण्यास पुढील पाच वर्षे पुरेशी आहेत!
तेव्हा सावध व्हा! शिका!! आत्मसात करा!!!
बस. एवढाच एक पर्याय तुमच्या-आमच्या समोर शिल्लक आहे.

- गंगाधर मुटे
३०/१२/२०१६

************************************************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 ***********************************************
अंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-
वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी: 
A/c Name - ANGARMALA
A/c No - 0202002100027538
Punjab National Bank Branch - Hinganghat (Wardha)
MICR Code - 442024005 IFSC Code - PUNB0020200


वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७

 

Sharad Joshi