कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई

कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी

नोंदणीची अंतिम मुदत : ५ डिसेंबर २०१७

नमस्कार,
           चवथ्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे. या कवीसंमेलन किंवा गझल मुशायऱ्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कवी आणि गझलकारांना याद्वारे सादर निमंत्रित करण्यात येत आहे.

नियम, अटी आणि सूचना :

  1. शासकीय मदतीशिवाय वाटचाल करणाऱ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला लोकवर्गणीशिवाय अन्य आर्थिक स्रोत नसल्याने सहभागींना मानधन व प्रवासखर्च देणे शक्य होणार नाही, हे आम्ही प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.
  2. सर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे. 
  3. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ शेतीमातीशी बांधिलकी राखणार्‍यांची असावी, तिथे व्यक्तिगत अहंभावनेला थारा नसावा.
  4. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे सर्व कामकाज पारदर्शीपणाने व्हावे, असा आमचा प्रयत्न असतो.
  5. प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र दिले जाईल.
  6. निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.
  7. फॉर्म भरताना आपला प्रतिनिधी सहभाग नोंदणी क्रमांक लिहिणे आवश्यक असल्याने प्रतिनिधी सहभाग नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून घ्यावी. अधिक माहिती http://www.baliraja.com/rep-2018 येथे उपलब्ध आहे.
  8. कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करावी. काही तांत्रिक अडचण आल्यास abmsss2015@gmail.com या विरोपाव्दारे (इमेल) किंवा बळीराजावरील व्यक्तिगत निरोपाच्या माध्यमातून आमचेशी संपर्क साधावा.
आपण सदस्य असल्यास लॉग इन LOG IN करा. सदस्य नसल्यास सदस्यत्व घेऊन SIGN IN लॉग इन करा.
Ad  नंतरच खालील लिंकवर क्लिक कराAd

कवी आणि गझलकारांची नोंदणी

Fingure-Right   

**********
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2018A या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
**********