माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
मेघ गुंजले, पवन रुंजले आतूर झाल्या सरी राजसा! परतून ये तू घरी॥
सूर्य, तारका, क्षितिज झाकले किर्र ढगांनी गगन वाकले गडगड होता बुरुजाभवती धडधड भरली उरी राजसा! परतून ये तू घरी॥
नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले कडकडता बघ वीज नभाला थरथरले गिरी-दरी राजसा! परतून ये तू घरी॥
शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
वाचकांच्या भेटी