माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
अंगाईगीत
कसा बाळ माझा? श्याम सावळासा जरासा जरासा, जरा साजरासा...!!
चांदणे स्वरुपी चंदनाचे अंग मुख पाहतांना तारकाही दंग असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा जरासा जरासा, जरा साजरासा...!!
नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली टिळा देखुनिया दृष्टही पळाली हसे बाळ माझा, विठू हासरासा जरासा जरासा, जरा साजरासा...!!
ओठी अंगठ्याने करी सुधापान तया चुंबण्याला लोभावते मन
वाचकांच्या भेटी