संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती

संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती

तृटी :

     या संकेतस्थळाला नुकतेच Drupal-6 वरून Drupal-7 वर अपग्रेड करण्यात आलेले असल्याने संकेतस्थळाची नव्याने फ़ेररचना करावी लागली. अजुनही काम सुरु आहे.

     मला हे काम करावे लागत असले तरी या विषयातील ज्ञान आणि अनुभव माझ्या गाठीशी नाही. मी ज्या भौगोलिक क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राच्या ५०० किलोमिटरच्या परिघात संकेतस्थळाची निर्मिती व जडणघडण करू शकणारे कुणी असेल असे वाटत नाही. असेल तर त्यांची मला माहिती नाही. त्यामुळे मदतीला किंवा मार्गदर्शनालाही कुणी नाही. आंतरजालावर काही मंडळी असेल पण त्यांची माहीती कळायला मार्ग नाही. संकेतस्थळ निर्माण करून देणारी प्रोफ़ेशनल व्यक्ती व साईट आहेत पण आपल्याला हवे तसे संकेतस्थळ तयार करणारे आढळले नाहीत.मागच्या खेपेस श्री राज जैन यांची मदत झाली होती पण आता ते बेपत्ता आहेत. त्यामुळे अशा स्थितीत आपला गाडा जसा जमेल तसा आपल्यालाच रेटावा लागला आहे.

     संकेतस्थळाला Drupal-6 वरून Drupal-7 वर अपग्रेड करण्यात आणि संरचना फ़ेररचना करण्यात यश आले आहे. पण नव्या संरचनेत अनेक तृटी राहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपणास विनंती आहे की तृटी आढळल्यास कृपया  प्रतिसादात नोंद करून सहकार्य करावे, ही विनंती

काही मुख्य नवीन सुविधा :

  1. Ctrl + Space बार वापरुन आता लेखनाची भाषा बदलता येऊ शकते.
  2. Back To Top या बटन सुविधेमुळे पेज स्क्रोल करणे सुलभ होईल.
  3. रेमिंगटन टाइपराइटर : बळीराजा डॉट कॉमवर मराठी टंकलेखनासाठी ’गमभन’ सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळासाठी ही सर्वोत्तम आणि सोईची देवनागरी युनिकोड टंकलेखन सुविधा असल्याने बहुतेक सदस्य हीच टंकलेखन प्रणाली पसंत करतात. मात्र काही सदस्यांनी रेमिंगटन टाइपराइटींग सुविधा उपलब्ध करावी, अशी इच्छा प्रदर्शीत केल्याने या पानापुरती रेमिंगटन टाइपराइटर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमध्ये Phonetic, Typewriter आणि Remington अशी तिहेरी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध असल्याने आपापल्या सोयीनुसार हवी ती टंकलेखन प्रणाली वापरणे सहज शक्य आहे. अधिक माहितीसाठी आणि लेखन करण्यासाठी  http://www.baliraja.com/indic हा धागा वापरावा.
  4. संकेतस्थळावर नियमितपणे वावरणार्‍यांनी मुखपृष्ठ या पेज ऐवजी नवीन लेखन या पेजचा वापर करावा.

मोबाईलधारकासाठी खास : बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांनी मोबाईल आवृतीचा वापर करायला हरकत नाही. डाव्या बाजुच्या विजेट्मध्ये मोबाईल स्विच या ब्लॉकमध्ये Desctop आणि Mobile असे दोन पर्याय आहेत. पैकी सोईचा व आवडता पर्याय निवडावा. आशा आहे की मोबाईल आवृतीचा वापर केल्यास संकेतस्थळाचे अवलोकन अथवा संकेतस्थळावर लेखन करणे अधिक सुलभ ठरू शकेल.

धन्यवाद आणि शुभेच्छेसह

- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया

विनिता's picture

लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट मराठीच ठेवा.

गंगाधर मुटे's picture

नोंद घेतली आहे. तसे करतो. मनपूर्वक धन्यवाद!

टीप : Ctrl+Space वापरल्यावर लगेच भाषा बदल होतो.

---------------------------------------
माझी वाङ्मयशेती - फेसबूकपेज
---------------------------------------

गंगाधर मुटे's picture

मोबाईलधारकासाठी खास :

बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांसाठी आता आपोआपच मोबाईल आवृतीवर रिडायरेक्ट केले जाईल. संकेतस्थळाची ही नवीन स्वयंचलित यंत्रणा दर्शकाने डेस्कटॉप वापरला आहे की मोबाईल वापरला आहे याचे संश्लेशन करुन दर्शकाला आपोआपच डॅस्कटॉप/मोबाईल आवृत्तीकडे डायव्हर्ट करेल.

मात्र मोबाईल वापरुनही डेस्कटॉप आवृत्ती किंवा मोबाईल आवृती पैकी कोणत्याही आवृतीची निवड करण्यासाठी मोबाईल स्विचचा वापर करता येईलच.

---------------------------------------
माझी वाङ्मयशेती - फेसबूकपेज
---------------------------------------