आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

गंगाधर मुटे's picture
 

 लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

 
Spardhaनमस्कार मंडळी,
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून आपण १ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने या "शेती आणि शेतकरी" विषयक स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु ६४ प्रवेशिका स्पर्धेत दाखल झाल्या, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजक मंडळ आणि परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
 
लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : डॉ. कैलास गायकवाड (मुंबई), राज पठाण (बीड), कमलाकर देसले (धुळे), विशाल कुळकर्णी (सोलापूर)
 
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : स्वाती धर्माधिकारी (नागपूर), प्रा. मनिषा रिठे (हिंगणघाट), गीता अग्रवाल (मुंबई), प्रा. राजेंद्र मुंढे (वर्धा), श्री नवनाथ पवार (औरंगाबाद), प्रा. डॉ. दिलीप बिरुटे (औरंगाबाद), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री प्रकाश मोरे (अकोला), श्री मिलिंद दामले (यवतमाळ), श्री देवदत्त संगेप (नागपूर)


लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गझल

गझल प्रथम क्रमांक   उपयोग काय सांगा नितिन देशमुख अमरावती
गझल द्वितीय क्रमांक   पीकपाणी प्रफ़ुल भुजाडे अमरावती
गझल तृतीय क्रमांक   फिर्याद एवढी की   मारोती पांडूरंग मानेमोड नांदेड
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गीतरचना  
गीतरचना प्रथम क्रमांक   दूर ढगांना पाहून राजीव मासरूळकर धारवाड, कर्नाटक
गीतरचना द्वितीय क्रमांक   शेतकरी राजा   नरेंद्र बापुजी खैरनार धुळे
गीतरचना तृतीय क्रमांक   शेतकरी बाबाची
आरती
रसिका उलमाले परभणी
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : छंदमुक्त कविता
छंदमुक्त कविता प्रथम क्रमांक   काय सांगू राज्या.....   किशोर मुगल चंद्रपूर
छंदमुक्त कविता द्वितीय क्रमांक   ती... विनिता माने पिसाळ पुणे
छंदमुक्त कविता तृतीय क्रमांक   अभिव्यक्ती रमेश ठोंबरे औरंगाबाद
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : पद्यकविता
पद्यकविता प्रथम क्रमांक   शेतकरी जिणे   प्रशांत पनवेलकर वर्धा
पद्यकविता द्वितीय क्रमांक   कुण्ब्याच्या आयुष्यात   दिनेश शिंदे नाशिक
पद्यकविता तृतीय क्रमांक   डाव मांड हा नवा ...!!  दिलीप वि चारठाणकर परभणी
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : ललितलेख
ललितलेख प्रथम क्रमांक   असा इस्कटला कोवळा .. किशोरी नाईक मुंबई
ललितलेख द्वितीय क्रमांक   टाहो विजय शेंडगे पुणे
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : वैचारिक लेख
वैचारिक लेख प्रथम क्रमांक   आजच्या समाजासाठी
स्त्रियांचे कर्तव्य
गीता खांडेभराड जालना
वैचारिक लेख द्वितीय क्रमांक   जिगरबाज शेतकरी   अरुण व्ही देशपांडे पुणे
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : शेतीविषयक लेख
शेतीविषयक लेख प्रथम क्रमांक   ‘रोजच मरे त्यांस…’ आसावरी इंगळे जामनगर, गुजरात
शेतीविषयक लेख द्वितीय क्रमांक   शेतकरीसंघटना 
एक विद्यापीठ
बाळासाहेब जवंजाळ अमरावती
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : कथा
कथा प्रथम क्रमांक   गारपीट किर्ती कुळकर्णी नांदेड
कथा द्वितीय क्रमांक   बळिराजा मोहन कुर्‍हाडे अमरावती

namo    स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार   namo

  आणि 

congrats   विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!   congrats

 पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्हप्रशस्तिपत्र व पुस्तके 

 पारितोषिक वितरण :
१.   २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ मध्ये वर्धा येथे आयोजित अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. 
२.   स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल. 
 
                                                                                                                               गंगाधर मुटे
                                                                                                                                 अध्यक्ष
                                                                                                                     अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  January 10, 2015 12:01 AM

  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार   :namo:

  आणि

  सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!   Congrats
  ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

          प्रत्येक रचनेचे आणि कलाकृतीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. प्रत्येक रचना अनन्यसाधारणच असते. त्यामुळे कोणतीही रचना उत्कृष्ठ किंवा निकृष्ठ वगैरे नसते. मात्र स्पर्धेची संधी मिळाल्याशिवाय स्पर्धा होत नाही. स्पर्धेशिवाय कस लागत नाही. नव्या जोमाचा संचार होण्यासाठी आणि परस्परांपासून प्रेरणा घेऊन अधिक सक्षमतेने अधिक दर्जेदार सृजनाच्या निर्मितीसाठी स्पर्धा महत्वाच्या ठरतात. स्पर्धेत सहभागी सर्व मित्रांनी या नाऊमेद न होता अधिक जोमाने, उत्साहाने व निग्रहाने पुढील वाटचालीसाठी सज्ज व्हावे. आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ च्या तयारीला आतापसूनच लागुयात.  Smile

  -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 • विनिता's picture
  विनिता
  January 22, 2015 01:59 PM

  आभार सर

  सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  January 27, 2015 11:53 AM

 • विजय शेंडगे's picture
  विजय शेंडगे
  January 29, 2015 09:30 PM

  सर्व विजेत्यांचे अभिनंदन. पण गंगाधरजी मी पुण्यातला असताना माझ्या नावापुढे बेळगाव कर्नाटक असे लिहिले आहे त्यामुळे. विजेता मी कि अन्य कोणी असा संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या उत्तराची वाट पहात आहे.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  January 29, 2015 09:52 PM

  आपण स्पर्धेच्या अटीमध्ये, बळीराजावर, शेतकरी डॉट इन व फ़ेसबूकवर जाहिरपणे तसेच व्यक्तिगत मेल व SMS पाठवून......

  स्पर्धकांनी आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता व संपर्क मोबाईल/फ़ोन नंबर इमेलद्वारे कळवावा असे वारंवार आवाहन केले होते.

  स्पर्धकांनी इमेलमध्ये जसा कळवला असेल तसाच पत्ता येणार, चुकिचा कसा येणार?