मनाला थेट भिडणारी गझल - तुषार देसले

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)

चौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ 
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई

प्रतिनिधी सहभाग नोंदणी करण्यासाठी येथे  Fingure-Right    क्लिक करा.

गंगाधर म. मुटे's picture



मनाला थेट भिडणारी गझल

        “माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा,  उत्तम बांधणी,  मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह

नक्कीच निराळा वाटतो. आपल्या गझलचा मीपण एक फॅन आहे. लगेच वाचून ही टाकला... आजवर मायबोली व फेसबूक-वर आबांकडून नेहमीच तुमच्या गझल व त्याविषयी वाचत होतो.  या गझल  संग्रहातही  नेहमीसारखीच  मनाला थेट भिडणारी  गझल  वाचून  आनंद  वाटला. मला  आपली गझल  का आवडते  हे आबांना  सांगताना  मी  म्हटले  की  "त्यांची गझल ही कल्पनेच्या विश्वात भरकटण्यापेक्षा वास्तव जगण्याचा जो ठाव घेते त्यामुळे ती जास्त भावते. काल जेव्हा मी गझल वाचत होतो तेव्हा हातात पेन्सिल होती आणि  आवडत्या  शेरांवर  टिकमार्क  करत  होतो पण बघता बघता सगळ्या पुस्तकावरच टिकमार्क झालेत..... 

काका, सामान्य कष्टकरी, शेतकरी हा मला जगातला सगळ्यात मोठा सृजक वाटतो. आपल्या रक्तात ती सृजन शिलता आहे. आणि तीच गझलेत उतरली आहे म्हणून गझल जीवंत वाटते. जब गझल का इतिहास लिखा जायेगा......  तेव्हा गझल कल्पनेच्या कोषातून बाहेर काढण्यात आपल्यासारख्या गझलकाराचे योगदान फ़ार मोठे आहे, याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.  खरं तर मी आत्ताच गझल प्रकाराशी परिचित होतो आहे.  त्यामुळे  माझं  रसग्रहण कदाचित बालिश वाटेलही परंतु आपल्या गझला मला मनापासून आवडल्यात इतकंच!


                                                                                                                     तुषार देसले
                                                                                  झोडगा (माळेगाव)
== ० == ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==