आम्ही शेतकरी बाया

आम्ही शेतकरी बाया

किसानांच्या बाया आम्ही शेतकरी बाया
नाही आम्ही राहणार आता दीनवाणी गाया ॥

सरकारला सांगू आम्ही
सावकाराला सांगू आम्ही
पोराबाळां हवे आमुच्या
पोटभर खाया ॥

आजवरी खाल्ल्या लाथा
आता करू वर माथा
लुटारूंची दुनिया आता
पडेल आमुच्या पाया ॥

उन्हाने शेतात मेलो
भुकेने घरात मेलो
क्रांती करू आता आम्ही
मिळवू थोडी छाया ॥

-साने गुरुजी